बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी, दुसरा दिवस : एल्गार, बवूमाची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ दर्बान
येथे सुरू असलेल्या बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीवर यजमान दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 367 धावांत आटोपला. एल्गारने 67 तर बवूमाने 93 धावा झळकविल्या. बांगलादेशतर्फे खलीद अहमदने 92 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर बांगलादेश पहिल्या डावात 4 बाद 98 धावा जमविल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 38 धावा जमविणाऱया अष्टपैलू हार्मेंरने गोलंदाजीत दर्जेदार कामगिरी केली. बांगलादेशच्या पहिल्या डावात हार्मेंरने 42 धावांत 4 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावामध्ये मेहमुदुल हसन जॉय 44 धावांवर खेळत असून नझमूल हुसेन 38 धावा जमविल्या. या जोडीने 50 धावांची भागीदारी केली होती.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प डाव- सर्वबाद 367 (बवूमा 93, एल्गार 67, खलीद अहमद 4-92), बांगलादेश प. डाव 4 बाद 94 (मेहमुदुल हसन जॉय खेळत आहे. 44, नझमुल हुसेन 38, हार्मेंर 4-42).