डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, महसूल, पोलीस दलातील कर्मचाऱयांना प्राधान्य
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना लस एक-दीड महिन्यात उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धय़ांना लस देण्यात येणार असून त्यासाठी यादी बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. एका बेळगाव तालुक्मयात पहिल्या टप्प्यात 15 हजार कोरोना योद्धय़ांना लस मिळणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात लवकरच लस उपलब्ध होणार असल्याचे सांगून दिलासा निर्माण केला होता. लस साठविण्यासाठी कोल्ड स्टोअरेजचीही व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या कार्यालय आवारात असलेल्या कोल्ड स्टोअरेजचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कार्यकर्ते, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, महसूल व पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी अशा कोरोनाच्या काळात काम केलेल्या 15 हजार जणांची यादी तयार केली असून त्यांना लस देण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार जानेवारी पहिला पंधरवडा किंवा महिना अखेर बेळगावात लस येण्याची शक्मयता आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने तयारी पूर्ण केली आहे. सरकारी, खासगी इस्पितळातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांची यादी तयार करण्यात आली आहे.
दोन टप्प्यात त्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे असे ज्ये÷ नागरिक व इतरांना लस मिळणार आहे. आरोग्य विभाग आतापासूनच तयारीला लागले आहे.
बुधवारी जिल्हय़ात 13 पॉझिटिव्ह
बुधवारी जिल्हय़ातील 13 जण पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगाव शहर व उपनगरातील सहा जणांचा समावेश आहे. जिल्हय़ातील बाधितांची संख्या 25 हजार 881 इतकी झाली असून आतापर्यंत 25 हजार 288 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 252 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 2 हजार 326 अहवालांची प्रतीक्षा आहे. बसव कॉलनी, रामतीर्थनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तीन वेगवेगळय़ा कॉलेजच्या कर्मचाऱयांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्ड स्टोअरेज ताब्यात घेणार…
पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धय़ांना लस देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कोल्ड स्टोअरेज आरोग्य खात्याकडे उपलब्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण सुरू होईल, त्यावेळी स्टोअरेजचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे खासगी कोल्ड स्टोअरेज, आईस फॅक्टरी ताब्यात घेऊन लस साठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी दिली. एपीएमसी व बागायत खात्याशी संबंधित कोल्ड स्टोअरेजचा वापरही लस साठविण्यासाठी करण्यात येणार आहे.