जागतिक आरोग्य संघटनेचा लसवितरणसंबंधीचा रोडमॅप
कोरोना महामारीच्या प्रकोपादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे हे वृत्त सर्वांनाच दिलासा देणारे आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत 50 कोटी लोकांना लसीचा डोस दिला जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. संघटनेने लस वितरणाचा रोडमॅप जाहीर करत कोवॅक्स कार्यक्रमात सामील 189 देशांमध्ये लसीच्या समान वितरणाला सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले आहे.
लस वितरणाच्या प्रारंभिक टप्प्यात सर्वाधिक जोखीम असलेल्या क्षेत्रांना प्राथमिकता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांनंतर प्रंटलाइनवर काम करणाऱया लोकांना ही लस उपलब्ध करण्यात येणार आहे. या दोन्ही गटांना लस दिल्यावर ज्येष्ठ नागरिकांना ही लस मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जगातील सुमारे 20 टक्के लोकसंख्येला लसीचा डोस उपलब्ध करविण्याचे लक्ष्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
कोरोना विषाणूच्या अतिजोखीम क्षेत्रात असलेल्या 20 टक्के लोकांवर पहिली नजर आहे. यात आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील लोक सामील आहेत, अशी माहिती डब्ल्यूएचओच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिली आहे. पूर्ण जगात कोरोना महामारीच्या उपचारात कार्यरत अनेक कर्मचाऱयांनी स्वतःचा जीव गमावला आहे. कोरोना विषाणूने बहुतांश बळी वयोवृद्ध लोकांचे घेतले आहेत. विशेषकरून 60 वर्षांवरील लोकांवर कोरोनाचा अधिक प्रकोप राहिला आहे. याचे मोठे कारण त्यांची कमकुवत प्रतिकारकशक्ती राहिली आहे.
2021 अखेरपर्यंत 2 अब्ज लोकांना लस
2021 च्या अखेरपर्यंत सुमारे 2 अब्ज लोकांना कोरोनाची लस उपलब्ध करविण्याचे लक्ष्य आहे. हा डोस कोरोना महामारीच्या फैलावाला रोखण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. 2021 च्या अखेरपर्यंत या महामारीवर नियंत्रण मिळविण्यात येईल. यातून बळींच्या आकडय़ात घट होईल, असे स्वामिनाथन म्हणाल्या.