‘एलजी’चा हा टीव्ही 15 देशांमध्ये खरेदी करता येणार – स्क्रीनचा वापर कोणत्याही प्रकारे करणे शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरियन कंपनी ‘एलजी’ने जगातील पहिल्या रोलेबल टीव्हीची विक्री सुरू केली आहे. याच टीव्हीला सिग्नेचर टीव्ही म्हटले जाते. सदरच्या टीव्हीला 65 इंचाची रोलेबल स्क्रीन आहे. या टीव्हीचे सादरीकरण कंपनीने तीन वर्षापूर्वीच केले आहे.
सदरच्या टीव्हीला कंपनीने सर्वात अगोदर दक्षिण कोरियन बाजारात मागील ऑक्टोबरमध्ये सादर केले होते. या टीव्हीची किमत ही जवळपास 64 लाख रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जर ग्राहकांना हा टीव्ही खरेदी करावयाचा असल्यास कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटवर जगभरात खरेदी केली जाऊ शकते. प्रारंभीच्या काळात ही विक्री अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससह 15 देशात सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एलजी रोलेबलमधील फिचर्स
? रोल होत असल्याने तीन विविध मोडमध्ये टीव्हीचा वापर शक्य
? टीव्ही ग्राहकाने कमांड दिल्यावर टीव्ही दिसणार अन्यथा नाही
? क्लॉक मोडमध्ये घडय़ाळाप्रमाणे काम करणार, टीव्ही पेममध्ये फॅमिली फोटो लावता येणार