जानेवारी ते जूनमध्ये केवळ 57,940 युनिट्स विक्री झाल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड 19 च्या महामारीचा प्रभाव जगभरातील विविध क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणात पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. नागरीकांचे मुख्य स्वप्न असणाऱया घर खरेदीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील प्रमुख सात शहरांमधील घरांची विक्री मोठय़ा प्रमाणात कमी झाली असून सन 2019 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 2020 च्या पहिल्या सहामाहीत घरांची विक्री 49 टक्क्मयांनी कमी झाल्याची माहिती प्रॉपर्टी कंसल्टेंट एनरॉकच्या अहवालात देण्यात आली आहे.
चालू वर्षातील जानेवारी ते जून या कालावधीमध्ये 57,940 युनिट्सची विक्री झाली आहे. सदरची घर विक्री ही शहरांच्या पातळीवर पाहिल्यास देशातील प्रमुख सात शहरांमधील विक्रीमध्ये 46 ते 51 टक्क्मयांची घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर 2020 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱया तिमाहीत मात्र ही विक्री 22 टक्मक्मयांवर राहिली आहे.
जानेवारी ते मार्च 2020 च्या तुलनेत एप्रिल ते जून 2020 च्या मध्यावर ही विक्री 72 टक्क्मयांनी घसरली आहे. तर 2019 च्या दुसऱया तिमाहीच्या तुलनेत 2020च्या दुसऱया तिमाहीत ही विक्री 81 टक्क्मयांनी कमी राहिली आहे. जानेवारी ते जून 2020 च्या मध्यावर नवीन सादरीकरणात 56 टक्क्मयांची घसरण झाली आहे. अहवालाच्या माहितीनुसार देशात मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून देशव्यापी लॉकडाऊन केल्याच्या कारणामुळे सर्वात मोठय़ा प्रमाणात रियल इस्टेट क्षेत्र प्रभावीत झाले आहे.