घसरणीसह आयात 6.8अब्ज डॉलर्सच्या घरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबरच्या पहिल्या सहामाहीत सोने आयात 57 टक्क्मयांनी घटून 6.8 अब्ज डॉलर्स म्हणजे 50,658 कोटी रुपयांवर राहिली असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.
कोविड19 च्या महामारी दरम्यान सोने मागणीत मोठी घट होत गेल्यानेच आयातीत घसरण राहिलेली आहे. विशेष बाब म्हणजे सोने आयात देशाच्या चालू खात्याच्या तोटय़ाला(कॅड) प्रभावित करत आहे. यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत सोने आयात 1,10,259 कोटी रुपयांवर राहिली होते. या प्रकारे एप्रिल ते सप्टेंबर मध्ये चांदीची आयातही 63.4 टक्क्मयांनी घटून 5,543 कोटींच्या घरात पोहोचलेली आहे.
सोने आणि चांदी आयातीमध्ये घसरण झाल्याने देशातील चालू खात्याचा तोटा कमी झाला आहे. आयात व निर्यातीच्या अंतराला कॅड असे म्हटले जाते.
सोने आयातीत भारताचे स्थान
अन्य देशांशी बरोबरी केल्यास सोने आयातीत भारताचे स्थान हे अग्रस्थानी असल्याची माहिती आहे. सोने आयात प्रामुख्याने आभूषण उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी केली जात आहे. भारतात सोन्याच्या दागिन्यांना मागणी अधिक असते. भारत जवळपास वर्षाकाठी 800 ते 900 टन सोने आयात करत असल्याची नोंद आहे.