वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाली असून सदर सदस्याला पाच दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती या संघाच्या प्रँचायझीनी दिली आहे.
रिकी पाँटिंगची कोरोना चाचणी घेण्यात आली पण ती निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसापासून दिल्ली संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. प्रमुख प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि त्यांच्या कुटुंबीय सदस्यांना आयासोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून दिल्ली कॅपिटल्समध्ये आतापर्यंत सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बुधवारी दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा दणदणीत पराभव केला होता. दिल्ली संघातील टीम सिफर्ट तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श यांना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे.