वार्ताहर/ खडकलाट
पांगिरे (ए) येथे सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास साडेआठ एकर उसाच्या फडास आग लागून सुमारे 9 लाखांचे नुकसान झाले. गावातील युवा मंडळे व शेजारच्या शेतकऱयांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून आग आटोक्मयात आणली. शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे?.
याबाबत माहिती अशी की, पांगिरे (ए) येथील मराठी व कानडी प्राथमिक शाळेच्या पाठीमागे सर्व्हे नं. 18/4 मध्ये सुरगोंडा आण्णासाहेब पाटील यांचा 4 एकर व सर्व्हे नं. 18/13, 14 व 3 मध्ये विपुल दादासाहेब पाटील यांचा साडेचार एकर उसाचा फड आहे. सुरगोंडा पाटील यांच्या उसाच्या शेतातच हेस्कॉमचा टी.सी. आहे. या टी.सी. मध्ये शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून उसाच्या फडास आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱयांनी खडकलाट येथील वीज उपकेंद्रास फोन करून वीजप्रवाह बंद केला. शेजारचे शेतकरी व गावातील युवकांनी जिवाचा आटापिटा करून आग आटोक्मयात आणली.
दरम्यान निपाणी अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा तर चिकोडीहून एक अग्निशमन दलाची गाडी काही वेळात पोहोचली. मात्र फडात गाडीस जाण्यास वाटच नसल्यामुळे या गाडय़ांचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. सायंकाळी साडेपाच वाजता खडकलाट हेस्कॉम वीज उपकेंद्राचे विभागीय अधिकारी मडीवाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिकारी व हेस्कॉमच्या अभियंत्यांनी पंचनामा केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱयांना हेस्कॉमतर्फे 40 टक्के नुकसान भरपाई मदत म्हणून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यापुढे तरी हेस्कॉमनेही खबरदारी घ्यावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.