बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीने घेतली दखल : सांडपाणी जाण्यासाठी पाईप घालून केला मार्ग, व्यावसायिकांसह नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
लक्ष्मीटेकडी पाईपलाईन रोड येथील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत होते. अखेर ग्रा. पं. ने याची दखल घेतली असून, रस्त्यावर पाईप घालून सांडपाणी जाण्याचा मार्ग निर्माण केला आहे. सदर समस्येचे निवारण करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लक्ष्मीटेकडी पाईपलाईन रोड परिसरात महालक्ष्मीनगरकडे जाणाऱया रस्त्याशेजारी गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. तसेच या ठिकाणी रस्त्यावरून सांडपाणी साचून रामघाट रोडवर वाहत होते. परिणामी ये-जा करणाऱया वाहनधारकांच्या आणि पादचाऱयांच्या अंगावर सांडपाणी उडत होते. जवळच भाजीविपेते तसेच काही व्यावसायिक असल्याने त्यांनादेखील या समस्येचा सामना करावा लागत होता. सांडपाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली होती. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वृत्ताची दखल घेऊन ग्रा. पं. ने या समस्येचे निवारण केले आहे.
याठिकाणी पाईपलाईनच्या पूर्व बाजूला महापालिकेची हद्द, पश्चिमेला बेनकनहळ्ळी आणि हिंडलगा ग्रा. पं. ची हद्द असल्याने समस्येकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. महालक्ष्मीनगरचा भाग बेनकनहळ्ळी ग्रा. पं. मध्ये येत असून, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच रस्त्याशेजारी गटार नसल्याने सांडपाण्याची समस्या निर्माण झाली होती. अखेर ग्रा. पं. ने सांडपाणी जाण्यासाठी जेसीबीने चर खोदली आहे. तसेच रामघाटरोड रस्त्याशेजारी दोन पाईप घालून सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या समस्येचे निवारण करण्यात आल्याने व्यावसायिक आणि नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
येथील रस्ताही खूपच खराब झाला असून, वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून पादचाऱयांना ये-जा करणे देखील कठिण बनले आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.