येळ्ळूर -अवचारहट्टी रस्ता गेला वाहून
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर येथील अरवाळी धरण परिसरात मागील चार दिवसांपासून धुवाधार पाऊस होत असल्याने धरण ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे शुक्रवारी सकाळीयेळ्ळूर -अवचारहट्टी हा रस्ता वाहून गेला. यामुळे अवचारहट्टी,यरमाळ या गावांचा संपर्क तुटला असून दोन्ही बाजूंनी वाहन चालक अडकले आहेत.