वृत्तसंस्था/ हरारे
पाकिस्तानने शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान झिंबाब्वेचा पहिल्या कसोटीत केवळ तिसऱया दिवशी एक डाव आणि 116 धावांनी दणदणीत पराभव करत दोन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. पाकच्या हसन अलीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या पहिल्या कसोटीत झिंबाब्वेचा पहिला डाव 176 धावांत आटोपल्यानंतर पाकने 4 बाद 264 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा डाव 133 षटकांत 426 धावांवर संपुष्टात आला. पाक संघातील फवाद अलमने 204 चेंडूत 20 चौकारांसह 140, इम्रान बट्टने 7 चौकारांसह 91, अबीद अलीने 10 चौकारांसह 60, अझहर अलीने 5 चौकारांसह 36, रिझवानने 4 चौकारांसह 45, हसन अलीने 26 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. झिंबाब्वेतर्फे मुझारबनीने 73 धावांत 4, टिर्पेनोने 89 धावांत 3 तर निगेव्हाने 104 धावांत 2 गडी बाद केले. पाकने पहिल्या डावात झिंबाब्वेवर 250 धावांची आघाडी मिळविली.
हसन अलीच्या भेदक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेचा दुसरा डाव केवळ 46.2 षटकांत 134 धावांत आटोपला. झिंबाब्वेच्या दुसऱया डावात मुसाकेंदाने 5 चौकारांसह 43, केसुझाने 3 चौकारांसह 28, कर्णधार बेंडॉनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29, चेकाबेव्हाने 2 चौकारांसह नाबाद 14 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. झिंबाब्वेचा दुसरा डाव 46.2 षटकांत 134 धावांत आटोपल्याने पाकने ही पहिली कसोटी एक डाव आणि 116 धावांनी जिंकली. हसन अलीने 36 धावांत 5 तर नौमन अलीने 27 धावांत 2 आणि अश्रफने 22 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक झिंबाब्वे प डाव 176, पाक प. डाव सर्वबाद 426 (फवाद अलम 140, इम्रान बट्ट 91, अबीद अली 60, अझहर अली 33, रिझवान 45, हसन अली 30, मुझारबेनी 4-73, टिर्पेनो 3-89, निगेरेव्हा 2-104), झिंबाब्वे दु. डाव 46.2 षटकांत सर्वबाद 134 (केसुझा 28, मुसाकेंदा 43, टेलर 29, चेकाबेव्हा नाबाद 14, हसन अली 5-36, नौमन अली 2-27, अश्रफ 1-22).