वृत्तसंस्था/ केपटाऊन
येत्या एप्रिल महिन्यात पाकचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकमध्ये मालिका खेळत आहे. आता पाकचा संघ एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर येणार असल्याची माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिली आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि पाक यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 2 ते 7 एप्रिल दरम्यान होणार आहे. या मालिकेनंतर चार सामन्यांची टी-20 मालिका 10 ते 16 एप्रिल दरम्यान आयोजित केली आहे. या मालिकेतील सामने जोहान्सबर्ग किंवा प्रिटोरिया येथे खेळविण्याची शक्मयता आहे. या मालिकेवेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने केली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाक यांच्यातील पहिला वनडे 2 एप्रिलला प्रिटोरियात, दुसरा वनडे 4 एप्रिलला जोहान्सबर्गमध्ये, तिसरा वनडे सामना 7 एप्रिलला प्रेटोरियामध्ये खेळविला जाईल. त्यानंतर पहिला टी-20 सामना 10 एप्रिलला जोहान्सबर्गमध्ये, दुसरा टी-20 सामना 12 एप्रिलला जोहान्सबर्गमध्ये, तिसरा टी-20 सामना 14 एप्रिलला प्रिटोरियात आणि चौथा टी-20 सामना 16 एप्रिलला प्रिटोरियात होणार आहे.