जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानातील उदयपूर जिल्हय़ातील एका खागसी शाळेतील शिक्षिका नफीसा अत्तारी हिला भारताविरोधात झालेल्या पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. टी-20 विश्वकप स्पर्धेत रविवारी हा सामना झाला होता. या सामन्यानंतर या शिक्षिकेने पाकिस्ताच्या विजय साजरा केला. तिने आपल्या मोबाईलवर आम्ही जिंकलो, असा संदेश टाकला.
तिच्या या कृतीमुळे तिला निलंबित करण्यात आले. आपण हेतुपुरस्सर असे केले नव्हते अशी सारवासारवी करण्याचा तिने नंतर प्रयत्न केला. पाकचा विजय साजरा करतानाची तिची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पाकिस्तानी खेळाडूंचे छायाचित्र टाकून त्याखाली आम्ही जिंकलो असा संदेश लिहिला होता. ती पाकिस्तानची समर्थक आहे का, असे तिला विचारण्यात आले होते. त्यावेळी तिने होय असे उत्तर पोस्ट केले होते. त्यामुळे तिच्याविरोधात कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट पेले.