वृत्तसंस्था/ रावळपिंडी
शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमान पाकने झिम्बाब्वेविरुद्ध 50 षटकात 8 बाद 281 धावा जमविल्या. पाकतर्फे डावखुरे फलंदाज हॅरिस सोहेल आणि इमाम उल हक यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
उभय संघांमध्ये तीन सामन्यांची ही वन डे मालिका खेळविली जात आहे. पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॅरिस सोहेलने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 82 चेंडूत 71 तर इमाम उल हकने 58 धावा झळकविल्या. कर्णधार बाबर आझम 19 धावांवर बाद झाला. इमाम उल हकने आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये 6 चौकार ठोकले. इमाद वासीम आणि अश्रफ यांनी 42 धावांची भागीदारी केली. शेवटच्या पाच षटकात पाकने 48 धावा झोडपल्या. झिम्बाब्वेतर्फे टी. चिसोरोने 31 धावात 2 गडी बाद केले.