बांगलादेश-पाक पहिली कसोटी उद्यापासून
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
पाकिस्तान व बांगलादेश यांच्यात होणाऱया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील कसोटीसाठी आयसीसीने निगेल लाँग व ख्रिस गॅफनी यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती केली आहे.
गॅफनी तसेच मरायस इरासमुस हे पहिल्यांदाच पाकिस्तान दौऱयावर जाणार आहेत तर लाँग यांनी कराची (3), लाहोर (2) व मुल्तान (1) या ठिकाणी एकूण 6 वनडे सामन्यांत पंचगिरी केलेली आहे. ते सुमारे दशकाच्या खंडानंतर पाकमध्ये पंचगिरी करणार आहेत. जानेवारी 2009 मध्ये पाक-लंका सामन्यात लाँग यांनी शेवटची पंचगिरी केली होती. दरम्यान, या मालिकेत रिची रिचर्डसन सामनाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी पाकचा शेवटचा दौरा केला होता. लाहोरमध्ये झालेल्या वर्ल्ड इलेव्हन-पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यांसाठी ते गेले त्यावेळी गेले होते.
बांगलादेशने पाकविरुद्ध तीन टी-20 सामने खेळले आणि ही मालिका 2-0 अशी गमविली. आता या दोन संघांत दोन कसोटी व वनडे लढत होणार आहे. शुक्रवारपासून यातील पहिली कसोटी सुरू होत आहे. कसोटी झाल्यानंतर एप्रिलमध्ये बांगलादेश संघ पुन्हा पाक दौऱयावर येणार आहे. यावेळी एकमेव वनडे सामना 3 एप्रिल रोजी होईल तर दुसरी कसोटी 5-9 एप्रिल या कालावधीत होणार आहे.