ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटामध्ये आज सकाळी आत्मघाती स्फोट झाला. या स्फोटात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले असून, 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शेख जैद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
क्वेटातील मास्टंग रोड येथे आज सकाळी एका दुचाकीस्वाराने सुरक्षा दलाच्या चेकपोस्टवर असलेल्या पाक लष्कराच्या वाहनाला धडक दिली. त्यावेळी हा स्फोट झाला. या आत्मघाती स्फोटात पाक लष्कराचे 3 सैनिक ठार झाले. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शेख जैद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटातील काही जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनास्थळी बॉम्बनाशक पथक दाखल झाले असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे.