ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात 60 हिंदूंना एकत्र करून त्यांना मौलवी कलमा (इस्लामची शपथ) देत आहेत. मतली नगर समितीचे अध्यक्ष अब्दुल रौफ निजामी यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार, सिंध प्रांतातील मीरपूर आणि मिठी भागात मौलवी जबरदस्ती हिंदु लोकांना एकत्र करून त्यांना इस्लामची शपथ देत आहेत. व्हायरल व्हिडीओ 6 जुलैचा असल्याचे सांगण्यात येते. या धर्मांतरामागे सिंध धर्मगुरू मियान मिथू आणि अब्दुल रऊफ निजमानी यांचा हात असल्याचे सांगितले जाते. मिया मिथू पाकिस्तानातील हिंदू मुलींचे अपहरण करण्यासाठी आणि जबरदस्तीने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्यारा म्हणून कुप्रसिद्ध आहे. याआधीही मिथूने पाकिस्तानातील गरीब हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांचे जबरदस्ती धर्मांतर केले होते.