ऑनलाईन टीम / रियाध :
कर्जाची 3.2 अब्ज डॉलरची रक्कम थकवल्याने सौदी अरेबियाने पाकिस्तानचा कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आहे.
नोव्हेंबर 2018 मध्ये पाकिस्तानचा सौदी अरेबियाकडून 6.2 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यासाठी करार झाला होता. त्या करारानुसार सौदीकडून पाकिस्तानला 3.2 अब्ज डॉलरचे कच्चे तेल उधारीवर घेण्याची सूट होती. या कराराची मुदत आता संपली आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तानचा अर्थ विभाग सौदी अरेबियाशी कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी चर्चा करत आहे. संपलेल्या कराराच्या नुतनीकरणासाठी पाक प्रयत्नशील आहे. मात्र, पाकच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तान चीनवर आशा ठेवून आहे. अर्थव्यवस्थेचा उडलेल्या बोझवाऱ्यामुळे पाकिस्तानला दिलेली आर्थिक मदत आयएमएफनेही रोखली आहे. त्यामुळे पाकची सेंट्रल बँकही अडचणीत येण्याची शक्यता आहे.