ऑनलाईन टीम / मुजफ्फराबाद :
निलम आणि झेलम नदीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर धरणांच्या बांधकामाविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.
चीन आणि पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या निलम आणि झेलम नदीवर ताबा घेतला आहे. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन करत या नद्यांवर धरणाचे बांधकाम सुरू केले आहे. याविरोधात सोमवारी मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरुन निलम, झेलम आणि कोहला हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बांधकामाचा निषेध केला.
तसेच जागतिक पातळीवर हा मुद्दा उचलून धरण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी ट्विटरवर #SaveRiversSaveAJK हे कॅम्पेनही ट्रेंड केले आहे.