ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचा जलद गोलंदाज हारिस रऊफ याचा कोरोना रिपोर्ट चौथ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. त्याला तात्काळ लाहोरहून इस्लामाबादला आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले आहे.
हारिस याची आतापर्यंत पाच वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 4 वेळा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पीसीबीच्या मेडिल पॅनलच्या संपर्कात आल्याने हारिस याला कोरोनाची लागण झाली होती. 10 दिवसांतर हारिफ रऊफ यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी लाहोरमधील एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये जैविकदृष्ट्या सुरक्षित वातावरण तयार केले होते. मात्र, हारीस चौथ्यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्रिकेट बोर्डाने घरी परतण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हारिसला लाहोरहून इस्लामाबादला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.