पहिली टी-20
हरारे / वृत्तसंस्था
शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेल्या पहिल्या टी-20 लढतीत पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 11 धावांनी कसाबसा विजय संपादन केला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना रिझवानच्या नाबाद 82 धावांच्या खेळीमुळे 20 षटकात 7 बाद 149 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 7 बाद 138 धावांपर्यंत मजल मारता आली. झिम्बाब्वेतर्फे क्रेग इरविन (34) व तिनाशे कमान्हुक्मवे यांनी 56 धावांची भागीदारी साकारली. यामुळे, ते एकवेळ 11 षटकात 1 बाद 77 अशा सुस्थितीत होते. पण, बाबर आझमने मोहम्मद हाफीजला पाचारण केल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. उभय संघातील दुसरी टी-20 उद्या (शुक्रवार दि. 23) खेळवली जाईल.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान ः 20 षटकात 7-149 (रिझवान नाबाद 82, मधेव्हेरे 2-11, जॉनवे 2-24), झिम्बाब्वे ः 7-138 (एरविन 34, कादीर 3-29, हसनेन 2-27, हाफीज 4 षटकात 1-21).