कराची
पाकिस्तानचा फलंदाज अबिद अलीवर बुधवारी अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या कैद-ए-आझम चषक स्पर्धेदरम्यान मंगळवारी छातीत वेदना जाणवल्या आणि यामुळे त्याला तातडीने इस्पितळात दाखल केले गेले होते. अबिद अलीने 2019 मध्ये पदार्पण केले असून कसोटीत त्याने उत्तम चमक दाखवली आहे. 2021 मध्ये 9 कसोटीत 48.87 च्या सरासरीने 695 धावांची आतषबाजी करत त्याने जागतिक स्तरावर सर्वाधिक कसोटी धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.