ढाका / वृत्तसंस्था
मोहम्मद रिझवान (40) व हैदर अली (45) यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने येथील तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात 5 गडी राखून धुव्वा उडवला आणि ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवरील या लढतीत बांगलादेशला 7 बाद 124 धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानने 20 षटकात 5 बाद 127 धावांसह विजय संपादन केला. पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 5 चेंडूत 6 धावा देत महमुदुल्लाहने हैदर अली, सर्फराज अहमद व इफ्तिकार अहमद असे 3 फलंदाज गारद केले. मात्र, शेवटच्या चेंडूवर नवाझने विजयी चौकार फटकावत क्लीन स्वीपवर शिक्कामोर्तब केले.