अबु धाबी / वृत्तसंस्था
पाकिस्तानने तुलनेने दुबळय़ा नामिबियाचा 45 धावांनी फडशा पाडत आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझवान (50 चेंडूत नाबाद 79) व कर्णधार बाबर आझम (48 चेंडूत 70) यांच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने 20 षटकात 2 बाद 189 धावांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरात नामिबियाला 5 बाद 144 धावांवर समाधान मानावे लागले. हसन अली, इमाद वासिम, हॅरिस रौफ व शदाब खान यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान ः 20 षटकात 2 बाद 189 (मोहम्मद रिझवान नाबाद 79, बाबर आझम 70, मोहम्मद हाफीज नाबाद 32). नामिबिया ः 20 षटकात 5 बाद 144 (क्रेग विल्यम्स 40, डेव्हिड विएझे नाबाद 43. इमाद वासिम 1-13).