अफगाणलाही नमवले, सुपर-12 फेरीत विजयाची हॅट्ट्रिक
दुबई / वृत्तसंस्था
कर्णधार बाबर आझमची 51 धावांची समयोचित खेळी आणि 19 व्या षटकात असिफ अलीच्या 4 उत्तुंग षटकारांच्या बळावर पाकिस्तानने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला 5 गडी राखून मात देत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. या लढतीत अफगाणिस्तानने 6 बाद 76 वरुन 6 बाद 147 धावांची मजल मारली तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19 षटकात 5 बाद 148 धावांसह विजय संपादन केला. अवघ्या 7 चेंडूत 25 धावांची आतषबाजी करणाऱया असिफ अलीने 19 व्या षटकात 4 षटकार खेचले, तो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
पाकिस्तानचे उर्वरित 2 सामने दुबळय़ा स्कॉटलंड व नामिबियाविरुद्ध होणार असून सलग तीन विजयांमुळे त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान ः 20 षटकात 6 बाद 147 (मोहम्मद नबी 32 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 35, गुलबदिन नईब 25 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 35, झॅद्रन 22. इमाद वासिम 2-25).
पाकिस्तान ः 19 षटकात 5 बाद 148 (बाबर आझम 47 चेंडूत 4 चौकारांसह 51, फखर झमन 30, असिफ अली 7 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 25. रशिद खान 2-26).