ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीएमएल – एन चे नेता शाहिद खकान अब्बासी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी शाहिद खकान अब्बासी यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांचे रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आले. सध्या ते स्वतः च्या घरातच आयासोलेट आहेत. अब्बासी हे ऑगस्ट 2017 ते मे 2018 या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान होते.
तसं पाहायला गेलं तर, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले अब्बासी हे पहिलेच नेते नाही आहेत. याआधी केंद्रीय राज्यमंत्री शहरयार अफरीदी, पीएमएएल आमदार मिया नावेद अली आणि पीपीपी नेता शरजील मेनन यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. तर पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पार्टीच्या नॅशनल असेंबील चे मुख्य व्हिप अमीर डोगर देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
दरम्यान, सध्या पाकिस्तानमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. आता पर्यंत पाकिस्तानात एक लाख पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये 2 हजार पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे.