इस्लामाबाद
पाकिस्तानात जमीयत उलेमा-ए-इस्लामचे बलुचिस्तानातील खासदार मौलाना सलाहउद्दीन अयूबी (62 वर्षे) यांनी 14 वर्षीय मुलीशी विवाह केला आहे. याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या आवाहनानंतर पोलिसांनी याचा तपास हाती घेतला आहे. तर मुलीच्या वडिलांनी विवाहाची पुष्टी दिली आहे. पाकिस्तानातील कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय किमान 16 वर्षे असणे आवश्यक आहे. याहून कमी वयाच्या मुलीशी विवाह केल्यास त्याला गुन्हा मानून शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मौलाना अयूबी बलुचिस्तानच्या चित्रालचे खासदार आहेत. मौलाना फजल-उर-रहमान यांच्या पक्षाचे ते खासदार आहेत. रहमान हे सध्या पाकिस्तान डेमोक्रेटिक प्रंटचे नेते आहेत. मुलीच्या शाळेने जन्म प्रमाणपत्र प्रसारमाध्यमांना उपलब्ध केले असून यात तिची जन्मतारीख 28 ऑक्टोबर 2006 नमूद आहे. पोलीस निरीक्षक सज्जाद अहमद यांनी तक्रार नोंद झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी मुलीच्या घरी जात तिच्या वडिलांची चौकशी केली आहे. पोलिसांसमोर मुलीच्या वडिलांनी विवाह झाला नसल्याचा दावा केला. पण प्रशासनाचे अधिकारी पोहोचले असता मुलगी 16 वर्षांची होईपर्यंत तिला खासदाराच्या घरी पाठवणार नसल्याची भूमिका मांडली आहे.