वृत्तसंस्था/ पुंछ
पाकिस्तानच्या सीमेवरील आगळीकी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय सैनिकांकडून अनेकदा दणका बसल्यावरही पाकिस्तानी सैनिक सीमेवर भारतविरोधी कारवाया करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्हय़ातील नियंत्रण रेषेवरील तरकुंडी सेक्टरमध्ये पाकिस्तानी स्नायपरने बीएसएफच्या उपनिरीक्षकावर गोळय़ा झाडल्या आहेत.
या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा झाला आहे. तरकुंडी सेक्टर हे बालाकोट सेक्टरला लागून आहे. बीएसएफचे उपनिरीक्षक पी. गुइटे यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. बीएसएफच्या 59 बटालियनमध्ये तैनात गुइटे हे मणिपूरचे रहिवासी होते.
पाकिस्तानच्या या आगळीकीनंतर भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक चौक्यांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत.