ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कोरोनामुळे कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता जगापुढे हात पसरून आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. ‘पाकिस्तानला आर्थिक मदत करा, अन्यथा कोरोनाआधीच लोकं उपासमारीने मरतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांची अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसचा सामना करण्याऐवढी बळकट नाही. जगभरातील मोठ्या संस्थांनी अशा कर्जबाजारी देशांना मदत करण्यासाठी पुढे यावे. पाकिस्तानला तातडीने आर्थिक मदत केली नाही तर कोरोनाआधीच उपासमारीने लोकांचा मृत्यू होईल.
तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशावरील कर्ज माफ करावे, असे आवाहनही इम्रान खान यांनी यावेळी केले आहे.