तरुण भारतच्या कार्यालयात तरुण भारतचा अंक देवून केला गौरवत्यांच्या अनोख्या कार्याची भाजपाच्या सांस्कृतिक सेलने घेतली दखल
प्रतिनिधी / सातारा
पाकिस्तानमध्येही हिंदू आहेत. मराठी भाषिक आहेत. तेथील मराठी भाषिकांना मराठीचे ज्ञान देण्यासाठी साताऱयातील दिलीप पुराणिक यांनी कार्य सुरु केले आहे. त्यांच्या कार्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले. आज सातारा दौऱयावर भाजपाचे सांस्कृतिक सेलचे शैलेश गोजमगुंडे हे साताऱयाच्या दौऱयावर आले असताना त्यांनी तरुण भारतच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी पुराणिक यांच्या कार्याची माहिती घेवून तरुण भारतचा अंक देवून गौरव करण्यात आला.
एक सातारकर म्हणून बरच काही करु शकतो हे अनेकदा पहायला मिळाले आहे. असेच साताऱयातील ज्येष्ठ असलेले दिलीप पुराणिक यांनी कोरोनाच्या काळात थेट पाकिस्तानमधील मराठी माणसांना त्यांनी मराठीची शिकवण देत आहेत. पुराणिक हे एलआयसी सेवानिवृत्त अधिकारी आहेत. सोशल मीडियाच्याद्वारे परदेशातील मराठी माणसांला आपली हक्काची मराठी शिकवत आहेत. त्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले. साताऱयाच्या दौऱयावर भाजपाचे सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे हे साताऱयाच्या दौऱयावर आले आहेत. त्यांनी तरुण भारतचा अंक वाचन करुन तरुण भारतच्या कार्यालयास भेट दिली. मराठी भाषेचे कार्य वृध्दीगंत करणारे ज्येष्ठ दिलीप पुराणिक यांना बोलवून घेवून तरुण भारतचा अंक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर, भाजपाचे सांस्कृतिक सेलचे पकंज चव्हाण, गणेश घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शैलेश गोजमगुंडे म्हणाले, साताऱयाच्या मातीतली माणसं ही मराठीसाठी आणि मातीसाठी झटतील. अवितरणे कार्य करतील. असेच दिलीप पुराणिक यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असे गौरवोद्गार काढले.
तरुण भारतचा अंक देवून केला गौरव
भाजपाचे सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते दिलीप पुराणिक यांचा गौरव तरुण भारतचा अंक देवून करण्यात आला. यावेळी तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांच्यासह मान्यवरांनीही पुराणिक यांचे कौतुक करण्यात आले.