कांगारुंचा 119 धावांनी दणदणीत विजय, उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ
वृत्तसंस्था/ सेंट जोन्स (अँटिग्वा)
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाने पाकचा 119 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ आहे. यापूर्वी इंग्लंड आणि अफगाण यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 बाद 276 धावा जमवित पाकला 277 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकचा डाव 157 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाच्या डावाला केल्वे, विली यांनी दमदार प्रारंभ करून देताना सलामीच्या गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली. पाकच्या कासीम अक्रमने केल्वेला यष्टीरक्षककरवी यष्टीचीत केले. केल्वेने 47 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिलरने एकेरी-दुहेरी धावावर अधिक भर देत संघाचा धावफलक हलता ठेवला. मिलर आणि विली यांनी दुसऱया गडय़ासाठी 101 धावांची भागिदारी केली. पाकच्या आवेस अलीने विलीचा त्रिफळा उडविला. विलीने 71 धावा झळकविल्या. त्यानंतर मिलर तंबूत परतला. 40 षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 203 धावा जमविल्या होत्या. मिलरने अर्धशतक झळकविले. कर्णधार कोनोलीने 33 धावा तर सेलझमनने 14 चेंडूत 25 धावा जमविल्या. पाकतर्फे काशीम अक्रमने 40 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकची स्थिती 5 व्या षटकात 2 बाद 27 अशी केविलवाणी झाली होती. पाकतर्फे अब्दुल फसेहने 28 तर इरफान खानने 27 धावा जमवित संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. पाकचा डाव 157 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे सेलझमनने 37 धावांत 3 गडी बाद केले. आता या स्पर्धेत शनिवारी होत असलेल्या भारत आणि विद्यमान विजेता बांगलादेश यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यातील विजयी संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.
या स्पर्धेतील प्लेट विभागातील प्ले ऑफ लढतीत संयुक्त अरब अमिरातने यजमान विंडीजचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. तसेच दुसऱया एका सामन्यात युगांडाने पापुआ न्यू गिनिया संघाचा प्ले ऑफ प्लेट विभागातील उपांत्य लढतीत 35 धावांनी पराभव केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 7 बाद 276 (विली 71, मिलर 64,कोनोली 33, सेलझमन 25, केल्वे 47, कासीम अक्रम 3-40), पाक- सर्वबाद 157 (अब्दुल फसेह 28, इरफान खान 27, सेलझमन 3-37).
कॅनडाचे 9 खेळाडू कोरोनाबाधित
19 वर्षाखालील वयोगटातील या क्रिकेट स्पर्धेत कॅनडा संघातील 9 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने प्लेट विभागातील दोन सामने रद्द करण्यात आले. कॅनडा संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी 9 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने या सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. कॅनडाकडे या समस्येमुळे पुरेसे क्रिकेटपटू उपलब्ध नसल्याने त्यांचा शनिवारी स्कॉटलंडविरुद्ध होणारा प्लेट विभागातील उपांत्य सामना रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्कॉटलंड संघाला पुढे जाण्याची संधी सरस धाव सरासरीच्या जोरावर मिळाली. कॅनडाच्या तुलनेत स्कॉटलंडची धावांची सरासरी अधिक सरस राहिलेली नाही. कोरोना महामारी समस्येमुळे आज (दि. 30) होणाऱया 15 व्या आणि 16 व्या