ऑनलाईन टीम / लाहोर :
पाकिस्तानात 21 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 500 हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने तेथील चिंता वाढली आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत 21 हजार 501 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 486 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 5 हजार 782 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, 15 हजार 233 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 111 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
पाकिस्तानातील 503 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये 250 डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सर्वांधिक संख्या पंजाब प्रांतात आहे. तेथील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना स्वत:च्या बचावासाठी साधनसामग्री उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.