ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तान मध्ये देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.पाकिस्तानमध्ये मागील चोवीस तासात आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 5 हजार 387 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामूळे 83 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात 5387 रुग्ण वाढल्याने पाकिस्तानातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 13 हजार 702 वर पोहचली आहे. तर आता पर्यंत 2 हजार 255 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत 36,308 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आता पर्यंत आढळलेल्या 1 लाख 13 हजार 702 मधील सिंध मध्ये आता पर्यंत 41 हजार 303 रुग्ण, पंजाब मध्ये 43 हजार 460 , खैबर – पख्तूनख्वामध्ये 14 हजार 527, बलूचिस्तानमध्ये 7 हजार 31, इस्लामाबाद मध्ये 5 हजार 963, गिलगित – बाल्टिस्तानमध्ये 974 आणि पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमधील 444 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.