ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तानमध्ये देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. पाकिस्तानमध्ये मागील चोवीस तासात 727 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामूळे 21 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात 727 रुग्ण वाढल्याने पाकिस्तानातील एकूण रुग्ण संख्या आता 2 लाख 81 हजार 863 वर पोहचली आहे. तर आता पर्यंत 6 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत 2 लाख 50 हजार पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आता पर्यंत आढळलेल्या 2 लाख 81 हजार 863 मधील सिंधमध्ये आतापर्यंत 1 लाख 21 हजार 373 रुग्ण, पंजाबमध्ये 93 हजार 847 , खैबर – पख्तूनख्वामध्ये 34 हजार 359, बलूचिस्तानमध्ये 11 हजार 793, इस्लामाबादमध्ये 15 हजार 141, गिलगित – बाल्टिस्तानमध्ये 2234 आणि पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमधील 2216 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.