इस्लामाबाद
पाकिस्तानातील पेशावर शहरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. या पावसाने भारतीय अभिनेते दिलीप कुमार आणि राजकपूर यांच्या जुन्या घरांचे नुकसान झाले असल्याचे समजते. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱया दिलीप कुमार व राज कपूर यांची पेशावर शहरात जुनी घरे आजही आहेत. बंद अवस्थेत असलेल्या या घरांना मुसळधार पावसामुळे नुकसान झेलावे लागले आहे. सध्याला या इमारती संरक्षणाखातर पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहेत. सरकारकडून दोन्ही कलाकारांच्या या घरांना राष्ट्रीय वारसास्थळ घोषित करण्यासह त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्याची योजना पूर्णत्वाला आली असल्याचे समजते. पण याचदरम्यान पावसाने दोन्ही घरे पाण्यात गेली असून काही भागाचे नुकसान झाले आहे. किस्सा ख्वानी बाजार परिसरात वरील अभिनेत्यांची दोन्ही घरे आहेत. नूतनीकरणाचे काम अद्यापही हाती घेतलेले नाही.