ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात पोलीस आणि नौदल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही दलाचे कर्मचारी जखमी झाले असून, घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील कराचीतील नौदलाचे एक अधिकारी आपल्या कुटुंबासमवेत समुद्रकिनारी फिरण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत नौदलाचे काही कर्मचारीही होते. दरम्यान, वाटेत पोलिसांनी या नौदल अधिकाऱ्याची गाडी आडवून विचारणा केली असता नौदल कर्मचाऱ्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. या वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. याप्रकरणी कराची पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.