ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात एका महिला पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शाहीन बलुच असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. ती एका सरकारी टीव्ही चॅनलमध्ये अँकर आणि रिपोर्टर होती.
शाहीन यापूर्वी इस्लामाबादमध्ये एका खासगी टीव्ही चॅनेलवर काम करत होती. त्यानंतर तिची एका सरकारी न्यूज चॅनेलने निवड केली. बलुचिस्तानमधील तुर्बत येथे बदली करण्यात आली. ती क्वेट्टा विद्यापीठातून पीएचडीही करत होती.
शनिवारी तिच्या राहत्या घरी दोन हल्लेखोर पोहचले. शाहीनने दरवाजा उघडताच त्यांनी तिच्यावर 5 राऊंड फायर केले. त्यानंतर हल्लेखोर पळाले. एका अज्ञाताने तिला रुग्णालयात दाखल करून तिथून पळ काढला. शाहीनच्या हत्येत तिचा पतीही सहभागी असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.