इस्लामाबाद
पाकिस्तानात विरोधकांच्या एकजुटीमुळे इम्रान खान यांचे सरकार बिथरले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. पीएमएल-एनच्या नेत्या मरियम यांनी रविवारी सरकारच्या विरोधातील सभेत भाषण केले होते. याच्या काही तासातच ही कारवाई करण्यात आली आहे. कराचीच्या हॉटेलमधील ज्या खोलीत वास्तव्यास होतो, तेथील दरवाजा तोडून पोलिसांनी कॅप्टन सफदर अवान यांना अटक केल्याचे मरियम यांनी सोमवारी ट्विट करत सांगितले आहे.
राजकारणातील सैन्याच्या हस्तक्षेपाच्या विरोधात मरियम उघडपणे बोलत आहेत. कराचीमध्ये रविवारी 11 पक्षांची आघाडीची सभा झाली होती. सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सामील होणाऱया नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कॅप्टन मोहम्मद सफदर यांना जिन्ना यांच्या मजारचे पावित्र्य भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.