ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात बनावट परवाना आलेल्या 50 वैमानिकांचे परवाने आज रद्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत हे वैमानिक हवाई प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवनाशी खेळ करत होते.
या वैमानिकांनी चुकीच्या पद्धतीने परवाने कसे मिळवले, याची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच देशाच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने (सीएए) न्यायालयाला यासंदर्भात कळवले आहे.
कराची येथे 22 मे रोजी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर वैमानिकांच्या बनावट परवान्याचे प्रकरण समोर आले. या घटनेत 97 लोक मारले गेले होते. या घटनेनंतर पाकिस्तानचे हवाई वाहतूक मंत्री सरवर खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, देशातील 860 सक्रिय वैमानिकांपैकी 260 परवाने एकतर बोगस आहेत किंवा त्यांनी परीक्षेत कॉपी करून परवाने मिळवले आहेत.