वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी राजनयिक शौकत अली मुकादम यांची मुलगी नूर (27 वर्षे) हिची मंगळवारी रात्री इस्लामाबादमध्ये तिच्या घरातच हत्या करण्यात आली. शौतक हे दक्षिण कोरिया तसेच कजाकिस्तानात पाकिस्तानचे राजदूत राहिले आहेत.
नूरवर गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर धारदार शस्त्राने तिची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात आणखीन एक व्यक्ती जखमी झाला आहे. तर जहीर जफर या व्यक्तीला तसेच नूरच्या एका मैत्रिणीला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे तपास अधिकाऱयाने सांगितले आहे. प्रमुख आरोपी जफर इस्लामाबाद येथील एका मोठय़ा कंस्ट्रक्शन कंपनीच्या चीफ ऑपरेटिंक ऑफिसरचा मुलगा आहे. नूरने जफरसोबत बेकअप केले होते.