बीजिंग / वृत्तसंस्था
चीनमध्ये पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कंपनीची चीनला जाणारी सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. चीनमध्ये दाखल झालेल्या दहा पाकिस्तानी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जिनपिंग प्रशासनाने कठोर निर्णय घेतला. चीनमध्ये तीन आठवडय़ांसाठी पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कंपनीची चीनला जाणारी पुढील तीन आठवडय़ांची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत.
पाकिस्तानला त्याच्याच मित्रांकडून जबर दणके बसत आहेत. आखाती देश, मलेशियापाठोपाठ आता चीननेही पाकिस्तानला जबर दणका दिला. आधीच पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कंपनीच्या 262 वैमानिकांच्या परवान्यांची चौकशी सुरू आहे. काही देशांनी पीआयएच्या विमानांवर तसेच त्यांच्या वैमानिकांवर बंदी घातली आहे. कर्जाच्या वाढत्या ओझ्याने पाकिस्तानचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर असतानाच चीन सरकारनेही पाकिस्तानच्या नागरिकांना आणि विमानांना प्रवेशबंदी केली आहे.