वृत्त संस्था /चित्तगाँग
पाकचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱयावर आहे. उभय संघामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून (शुक्रवार दि. 26) प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी 12 जणांचा पाकचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात हसन अली, अब्दुला शफीक आणि नौमन अली यांचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्याला स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल.
उभय संघातील दुसरी कसोटी 4 डिसेंबरपासून ढाक्यातील शेर बांगला क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन उपलब्ध राहणार नाही. त्याचप्रमाणे दुखापतीमुळे तमीम इक्बालला या सामन्यात खेळता येणार नाही.
पाक कसोटी संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (उपकर्णधार), अब्दुला शफीक, अबीद अली, अझहर अली, फईम आश्रफ, फवाद आलम, हसन अली, इमाम उल हक, नौमन अली,. साजीद खान, शाहीन अफ्रिदी.
बांगलादेश संघ- मोमिनूल हक (कर्णधार), एस. इस्लाम, सैफ हसन, नजमुल हुसेन, मुष्फीकर रहीम, लिटॉन दास, नुरूल हसन, मेहदी हसन मिराज, नईम हसन, टी इस्लाम, इ. हुसेन, अबु जायेद, यासीर अली, मेहमुदुल्लाह, आर. राजा.