वृत्तसंस्था/ कराची
महिला गटातील आगामी आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रतेची स्पर्धा झिम्बाब्वेत आयोजित केली गेली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाक आणि लंकेचे महिला क्रिकेट संघ झिंबाब्वेला रवाना झाले. सदर स्पर्धा हरारे येथे 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
पाकिस्तान-विंडीज महिला संघामध्ये 3 सामन्यांचे वनडे मालिका रविवारी समाप्त झाली. या मालिकेनंतर पाक आणि विंडीज संघानी मंगळवारी झिम्बाब्वेला प्रयाण केले आहे. चमिरा अट्टापटूच्या नेतृत्वाखाली लंकेचा महिला क्रिकेट संघ या पात्र फेरीच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेतींल सलामीचा सामना 21 नोव्हेंबर रोजी पाक आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. सदर स्पर्धेमध्ये 10 संघांचा समावेश आहे. 19 नोव्हेंबरला काही सरावाचे सामने आयोजित केले आहेत.