ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मार्च महिन्यापासून अफगाणिस्तानच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान आता भारताच्या वाघा बॉर्डरवरून अफगाणिस्तानला निर्यात करणार आहे. 15 जुलै पासून या निर्यातीला सुरुवात होईल.
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्या सीमेलगत 18 क्रॉसिंग पॉईंट्स आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हे सर्व एन्ट्री पॉईंट पाकिस्तानने बंद केले आहेत. दरम्यान, मार्चपासून अफगाणिस्तानला कोणत्याही मालाची निर्यात पाकिस्तानकडून होऊ शकली नाही. अफगाणिस्तान सरकारच्या विशेष विनंतीवरून पाकिस्तान सरकारने भारताच्या वाघा सीमेवरून अफगाणिस्तानला निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तान ट्रान्झिट ट्रेड करारानुसार ही परवानगी दिली आहे. पाकिस्तान सरकारने एक निवेदन जारी केले असून, व्यापारासह अफगाणिस्तान बरोबरचे सर्व द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहे. काबूल पाकिस्तानमार्गे वाघा सीमेवरील अटारी शहरातून व्यापार होणार आहे.