वेस्ट इंडिजचे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
ऑनलाईन टीम / कराची :
पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला जबरदस्त धक्का बसला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या तीन प्रमुख खेळाडूंसह एका स्टाप मेंबरला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात यासंदर्भात माहिती दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तानात पोहोचल्यावर कोरोना चाचणी प्रोटोकॉलअंतर्गत चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. यामध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटेल, अष्टपैलू रोस्टन चेस आणि कायल मायर्स यांच्यासह एका टीम मेंबरचा समावेश आहे. या सर्व सदस्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हा आमच्यासाठी मोठा धक्का असूनही आम्ही सामन्यासाठी तयारी करण्याची योजना आखली आहे. इतर सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्याने हा दौरा चालू राहू शकतो.
दरम्यान, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना सोमवारी (13 डिसेंबर) कराचीत होणार आहे. मात्र, त्यांच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने या मालिकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.