ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नदीत प्रवासी व्हॅन नदीत कोसळून 17 प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 16 सदस्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबाने व्हॅन भाड्याने घेतली होती. ही व्हॅन चिलास शहरातून रावळपिंडीला जात होती. कोहिस्तान जिल्ह्यातील पनिबा भागात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन सिंधू नदीत पडली. यात चालकासह 17 जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू केला. पण जोराचा पाऊस आणि खोल नदीमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते.