पाकिस्तानात 6 महिन्यांनी शाळा सुरू झाल्या आहेत. मुलांची सुरक्षा सामूहिक जबाबदारी आहे. शाळा सुरू करण्यासाठीचे कठोर नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यांचे पालन करणाऱया शाळांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. पहिल्या टप्प्यात 9 वी आणि 10 वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जातील. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालू महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू केल्या जाऊ शकतातअसे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले आहे. पाकिस्तानात 15 मार्चपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या.
नोव्हेंबरपर्यंत सर्वांना लस
नोव्हेंबरपर्यंत कोरोनावरी लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा चीनच्या आरोग्य अधिकाऱयाने केला आहे. चीनमध्ये कोविड-19 च्या चर लसींवर संशोधन सुरू असून त्यांची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यातील 3 लस गरजू आणि कर्मचाऱयांना देण्याचा प्रस्ताव आहे. सायनोफार्म आणि सायनोवेक बायोटेक कंपन्या 3 लसींवर संशोधन करत आहेत. चीनच्या सैन्याने जूनमध्ये या लसीला मंजुरी दिली होती.
निर्बंधांना झटका
अमेरिकेच्या पेन्सिलवेनिया येथील संघीय न्यायालयाने लोकांच्या एकत्र येण्यावर, टाळेबंदी लागू करणे आणि व्यवसाय बंद करण्याच्या गव्हर्नरांच्या आदेशाला घटनाबाहय़ ठरविले आहे. लोकांच्या मूलभूत अधिकारांची मर्यादा निश्चित करणाऱया गव्हर्नर टॉम वोल्फ्स यांच्या आदेशाला योग्य मानता येणार नसल्याचे डिस्ट्रिक्ट जर विलियम स्टिकमॅन यांनी एका याचिकेच्या सुनावणीवेळी म्हटले आहे. टॉम यांच्या आदेशाच्या विरोधात अनेक काउंटीजच्या महापौरांनी याचिका दाखल केली होती.
तुर्कस्तान : संसर्ग वेगवानचा वेग देशात अत्यंत वेगवान असल्याचे तुर्कस्तान सरकारने मान्य केले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. हा वेग रोखण्यास फारसे यश आलेले नाही अशी कबुली आरोग्यमंत्री फेहरिटेन कोका यांनी दिली आहे. तुर्कस्तानात दिवसभरात 1,716 नवे रुग्ण सापडले आहेत. कठोर निर्बंधांना अनेक संघटनांनी विरोध केल्याने सरकारला मागे हटावे लागले आहे. टाळेबंदी सारख्या उपायांमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येईल असे या संघटनांचे म्हणणे आहे.