ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकीउर रहमान लखवीला टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे.
सन 2008 मधील मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने लख्वीला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानमध्ये 6 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर लखवीची 2015 मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाली होती.
लखवीनेच हाफीज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना आखून दिली होती. मुंबईतील हल्ल्यात 10 सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 166 जणांना प्राण गमवावा लागला. तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते.