वृत्तसंस्था/ लाहोर
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. उभय संघातील कसोटी मालिकेला 4 मार्चपासून रावळपिंडीत प्रारंभ होईल. तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदा पाकच्या दौऱयावर येत आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ पाकच्या दौऱयात तीन कसोटी, तीन वन डे आणि एकमेव टी-20 सामना खेळणार आहे. यजमान पाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 4 ते 8 मार्च दरम्यान रावळपिंडीत होणार आहे. उभय संघातील तीन वन डे आणि एकमेव टी-20 सामना 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान खेळविला जाणार आहे. पाक आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळामध्ये झालेल्या बैठकीनंतर या दौऱयातील सामना वेळापत्रकामध्ये फेरबदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा पाक दौरा पाच आठवडय़ांचा राहील. या दौऱयामध्ये होणाऱया कसोटी मालिकेतील दुसरा सामना 12 ते 16 मार्च दरम्यान कराचीत तर तिसरा आणि शेवटचा सामना 21 ते 25 मार्च दरम्यान लाहोरमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 27 फेब्रुवारीला इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघातील सर्व खेळाडूंना एक दिवसासाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल.