प्रतिनिधी / तासगाव
मराठा लाईट इनफन्ट्रितून पाक आणि चीन बरोबर झालेल्या भारताच्या लढाईतील सहभागी असलेले निवृत्त सैनिक आणि डोंगरसोनी, ता.तासगांव येथील ज्येष्ठ नागरिक पांडूरंग शामराव झांबरे ( वय.75) यांचे बुधवारी निधन झाले. लेह, लडाख जम्मू काश्मिरसह महत्वपूर्ण ठिकाणी त्यांनी 24 वर्षे देशसेवा केली होती.
निवृत्तीनंतर डोंगर सोनी भागामध्ये अध्यात्मिक कार्य करत होते. महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा महालॅबचे व्यवस्थापक एस. पी. झांबरे यांचे ते वडिल होत. पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवांडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन डोंगरसोनी येथे शुक्रवार दि. 09 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.